निकिता प्रभूतेंडोलकर पुनर्मूल्यांकनानंतर जिल्ह्यात तृतीय

निकिता कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी

निकिताची जुळी बहीण नेहाचेसुद्धा गुण वाढले

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज, कुडाळची विद्यार्थिनी कु. निकिता विजय प्रभूतेंडोलकर हिने सन २०२२-२३ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुनर्मुल्यांकनाच्या निकालानंतर तिन्ही शाखेतून जिल्ह्यात तिसरी व कुडाळ तालुक्यात दुसरी येण्याचा मान मिळवला आहे.
निकिता ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असून तिला सुरुवातीला इंग्रजी विषयात ८७ गुण मिळाले होते. परंतु, नंतरच्या फेरतपासणीनंतर तिला ९० गुण मिळाले आहेत. आधीच्या गुणपत्रिकेप्रमाणे तिला ६०० पैकी ५६३ गुण मिळून तिला ९३.८३ टक्के मिळाले होते. परंतु आत्ताच्या सुधारित गुणपत्रिकेप्रमाणे तिला ६०० पैकी ५६६ गुण असून तिची टक्केवारी आता ९४.३३ टक्के एवढी झाली आहे.
तसेच तिची जुळी बहीण कु. नेहा प्रभूतेंडोलकर हिचा देखील इंग्रजी विषयातील एक गुण वाढल्याने नवीन टक्केवारीनुसार (९२ टक्के) तिने कुडाळ तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!