आजगाव येथे सरपंच बैठक यशस्वी

तालुक्यातीलआजगाव येथे राजगड या रिसॉर्ट वर सावंतवाडी तालुका सरपंच, उपसरपंच यांची सभा नुकतीच जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरपंच संघटना संघटक सुरेश गावडे,सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गावडे,सचिव जोशी ज्येष्ठ मार्गदर्शक तथा तांबोळी माजी सरपंच अभिलाष देसाई उपपस्थित होते.
सभेसाठी तालुक्यातील साधारण 42 सरपंच आणि 11 उपसरपंच आवर्जून उपस्थित होते.
यजमान आजगावं सरपंच यशश्री सौदागर उपसरपंच सुशील कामतेकर,मलेवाड उपसरपच हेमंत मराठे यांनी कार्यक्रमाचे. नियोजन केले होते. जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष,मार्गदर्शक आणि इतर यांनीही मार्गदर्शन केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी





