हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (सीव्हीडी) आणि फुफुसाचे आजार (सीओपीडी) च्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी लुपिनने महाराष्ट्र सरकारसोबत केला सामंजस्य करार

आरोग्य सेवा सुधारण्यासाठी, वेळेवर निदान सुनिश्चित करण्यासाठी आणि आरोग्य सेवांची सुलभता वाढविण्यासाठी सहयोग
मुंबई : लुपिन ह्युमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशनने (एलएचडब्ल्यूआरएफ), लुपिन लिमिटेड ची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)शाखा, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (सीव्हीडी) आणि फुफुसाचे आजार (सीओपीडी) च्या वाढत्या प्रादुर्भावाला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आज केली. ही भागीदारी या रोगांचे दीर्घकालीन प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृढ वचनबद्धतेसह, या आजारांवर त्वरित उपचार करण्यावर केंद्रित आहे.
“एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता म्हणून, लुपिनने भारतातील उपेक्षित समुदायांसाठी उच्च-गुणवत्तेच्या, किफायतशीर औषधांच्या सुधारित पुरवठ्यासाठी सातत्याने काम केले आहे. राज्य सरकारसह सहयोगी प्रयत्नांतून, आरोग्य सेवांची गुणवत्ता,सुलभता आणि वापर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून, विद्यमान आरोग्यसेवा प्रणाली आणि कार्यक्रमांना बळकट करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” लुपिनचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गुप्ता म्हणाले.
एलएचडब्ल्यूआरएफच्या ‘लाइवस्’ कार्यक्रमाच्या सामंजस्य करारावर माननीय डॉ. नागनाथ मुदम, सहसंचालक, असंसर्गजन्य रोग सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र आणि तुषारा शंकर, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रमुख, लुपिन लिमिटेड यांनी स्वाक्षरी केली.
“हा उपक्रम पालघरच्या निवडक तालुक्यांमध्ये सीव्हीडी आणि सीओपीडी चे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी तयार आहे. या आरोग्यविषयक समस्यांना योग्य त्या उपाययोजनांसोबत तोंड देण्यासाठी आमचे अतूट प्रयत्न निश्चितच समाजावर कायमस्वरूपी परिणाम सुनिश्चित करतील. प्रतिबंधात्मक उपाय, तात्काळ निदान आणि सर्वसमावेशक उपचार पर्यायांवर जोर देऊन, जिल्ह्यातील या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, आणि शेवटी समाजाचे सर्वांगीण आरोग्य आणि कल्याण यावर भर द्यायचा आहे,” असे डॉ. नागनाथ मुदम, सहसंचालक, असंसर्गजन्य रोग सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र म्हणाले.
तुषारा शंकर, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रमुख, एलएचडब्ल्यूआरएफ म्हणाल्या, “महाराष्ट्रात सीव्हीडी आणि सीओपीडी च्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य देऊन, रोग व्यवस्थापन आणि आवश्यक असलेली इतर मदत करून या आव्हानांना तोंड देणे हेच राज्य सरकारसोबतच्या आमच्या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक उपाय योजना करून आम्ही या रोगांचा प्रभावीपणे सामना करू आणि प्रभावित जनसमुदायाला सर्वांगीण सुविधा प्रदान करू इच्छितो.”
सुरुवातीच्या टप्प्यात पालघर आणि डहाणू या दोन तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून या मध्ये दोन्ही तालुक्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रा सोबत
पुढील पाच वर्षांमध्ये हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्राथमिक उदिष्टे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (सीव्हीडी) आणि फुफुसाचे आजार (सीओपीडी) यांच्याशी संबंधित जोखमींबद्दल जागरूकता वाढवणे, लवकर तपासणी व निदान करून गुंतागुंत टाळणे व मृत्यूदर कमी करणे आहे, शिवाय निरोगी जीवनशैलीला प्रोत्सहन देणे व प्रतिबंधात्मक उपायांच्या गरजांबद्दल लोकांना महत्व सांगितले जाईल.





