पाट हायस्कुलमध्ये योग दिन साजरा

विद्यार्थिनींनी संगीताच्या तालावर सादर केली प्रात्यक्षिके

प्रतिनिधी । कुडाळ : 21 जून जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पाट हायस्कूल कै. मा एकनाथजी ठाकूर कलाकादमीच्या विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार आणि योगाची प्रात्यक्षिके संगीताच्या तालावर सादर केली
योग दिनाचे महत्त्व समजण्यासाठी समाजात चांगला संदेश देण्याकरिता सौ शैवाली परब मॅडम सौ सिद्धी चव्हाण मॅडम कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या संकल्पनेतून योग नृत्याचे सादरीकरण केले. श्री. बोंदर सरांकडून भूगोल दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. तर पर्यवेक्षक राजन हंजनकर सर यांनी योगांचे प्रात्यक्षिके करून घेतली यावेळी मुख्याध्यापक श्री शामराव कोरे सर यांनी आभार मानले. यावेळी एस के . पाटील शिक्षण संस्था पाट चेअरमन श्री समाधान परब आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!