अंगावर पेट्रोल ओतून घेत तरेळे माजी सरपंचांची आत्महत्या

गंभीर भागल्याने माजी सरपंच उल्हास कल्याणकर यांचा मृत्यू
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दशक्रोशीतील नागरिकांची धाव
कणकवली तालुक्यातील तरळे गावचे माजी सरपंच उल्हास कल्याणकर (42) यांनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर उल्हास कल्याणकर यांना भाजलेल्या स्थितीतच कणकवली उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर तरेळे सह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या आत्महत्येची नेमके कारण समजू शकले नाही.
दिगंबर वालावलकर/ कणकवली