गोकुळ दुध उत्पादक संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे यांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

       कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक अरुणराव  डोंगळे यांची निवड झाल्यानंतर ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता आमदार वैभव नाईक यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न  व जिल्ह्यातील दुध उत्पादनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
error: Content is protected !!