श्री.वेतोबा विद्या मंदिर नाणोस नं.१ मध्ये नवांगाचे स्वागत व पुस्तक वाटप:-

सावंतवाडी

श्री वेतोबा विद्या मंदिर नाणोस नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांचे यावेळी ” गुलाब पुष्प” देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, या शाळेत बदली होऊन नव्याने दाखल झालेले शिक्षकवृंद श्री. चंद्रकांत सावंत, श्री. राघोबा गाड व सौ. सुजाता गाड यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने “गुलाब पुष्प” देऊन स्वागत करण्यात आले, सदर शिक्षकवृंदानी आपला परिचय व आतापर्यंत शिक्षण क्षेत्रात केलेल्या सेवेची माहिती दिली,
शासनाकडून मुलांना देण्यात
येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांची मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले, श्री. राघोबा गाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की , शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकांमध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे, याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वहयांची पानेही देण्यात आली आहेत,तसेच शाळेतील सर्व मुलींना व दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे ,त्याबाबतचा तसा अहवाल या शाळेतून त्वरित देण्यात आलेला आहे शाळेत मुलांना देण्यात येणारा पोषण आहार हा चांगला दर्जाचा देण्याचा आपला प्रयत्न राहील, मुलांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास हेच मुख्य ध्येय आमच असेल व ते सर्व शिक्षकवृंद प्रामाणिकपणे करणार आहोत,आम्हां शिक्षकवृंदाना जेवढे शक्य होईल तेवढ सहकार्य या शाळेला करणार आहोत त्यासाठी गावातील ग्रामस्थं व पालकवर्गा कडुनही साथ मिळेल अशी आशा व्यक्त केली, तर श्री. चंद्रकांत सावंत गुरुजी यांनी “सावित्रीबाई फुले दत्तक पालक” योजने बाबत सविस्तर माहिती दिली, आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७७ शाळेतील १२८ मुलींना दत्तक घेऊन मुलीसाठी प्रत्येकी रक्कम ३०००/- ( तीन हजार रुपये) प्रमाणे कायमस्वरूपी रक्कम शाळेतील बँक खात्यात जमा केली आहे, त्या रक्कमेवर मिळणा-या व्याज्याची रक्कम दत्तक मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते,आता नाणोस ही ७८ वी शाळा असून या शाळेतील २ मुलींना दत्तक घेऊन १३० ही संख्या पूर्ण होत आहे, सदरील २ दत्तक मुलींची रक्कम मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडे आपण लवकरच सुपूर्द करणार असल्याचे जाहीर केले,
शाळेतील काही विद्यार्थी मोफत गणेशापासून वंचित राहणार त्या
विद्यार्थ्यांना समितीचे शिक्षणतज्ञ तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर नाणोसकर यांनी गणेवेश देण्याचे जाहीर केले तर माजी उपसरपंच संजय नाणोसकर यांनी वह्या देण्याचे जाहीर केले,
त्यानंतर ” भूमी ग्रामविकास मंडळ नाणोस” च्या वतीने भारतभूषण, राष्ट्रीय समाज रत्न, आदर्श शिक्षक, समाज रत्न, सहकार रत्न, राष्ट्रीय रत्न, शिक्षण रत्न, विद्यार्थी कोकण रत्न, ज्ञानरत्न ,महाराष्ट्र गोवा आयकॉन अवॉर्ड, जीवनगौरव सन्मान , प्राप्त डॉ. श्री.चंद्रकांत तुकाराम सावंत गुरुजी यांना “स्नेहाची शाल” , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच श्री. वासुदेव(जिजी) जोशी यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले,व त्यांच्या भावी यशस्वी शैक्षणिक वाटचालीस मंडळाचे वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. प्रशांत परब यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.गाड गुरुजी यांनी केले, शिक्षक वृंदामार्फत मुलांना गोड खाऊ देण्यात आले,
त्यावेळी व्यासपीठावर उपसरपंच सौ. अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुधाकर नाणोसकर. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष श्री. राजाराम नाणोसकर ,अंगणवाडी मदतनीस सौ. भाग्यश्री नाणोसकर, सौ.वैष्णवी कांबळी ,सौ.रेश्मा नाणोसकर, सौ.ठाकूर, सौ.सावंत, शिक्षकवृंद व विद्यार्थी ,पालक आदी उपस्थित होते,.

error: Content is protected !!