हुमरमळा (वालावल) येथील सौ रमा गाळवणकर आणि श्रीम रेणुका परब यांना अहील्याबाई होळकर पुरस्कार

प्रतिनिधी । कुडाळ : महीलांच्या प्रश्नांसाठी आणि गावातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सौ रेणुका दत्ताराम परब आणि सौ रमा आत्माराम गाळवणकर या दोन महीलांचा सन्मान नुकताच हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री जंगले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक सौ रेश्मी राऊळ, अंगणवाडी सेविका श्रीम मिताली देसाई, अंगणवाडी सेविका सौ प्रीती प्रमोद वेंगुर्लेकर, मदतनीस श्रृती परकर, आरोग्य सेविका सौ चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश मयेकर, अमित बंगे उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!