मुंबई बेस्ट आगारात चिंदर सुपूत्र सुरेश गोलतकरांच्या कलेचा गौरव

आचरा–अर्जुन बापर्डेकर
मुंबईतील बेस्टच्या देवनार बस आगारात कामगारांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन तैलचित्राचे अनावरण नुकतेच निवृत्त आगार व्यवस्थापक अशोक नरवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी चित्रकार आणि चिंदर सडेवाडी येथील मुंबई माजी नगरसेवक सुरेश गोलतकर यांचा सत्कार केला गेला.
सुमारे तीस वर्षांपूर्वी याच ठिकाणी तत्कालीन बेस्ट अध्यक्ष नारायण राणे यांच्या हस्ते चिंदर गावचे सुपुत्र आणि मुंबई माजी नगरसेवक सुप्रसिद्ध चित्रकार आणि रंगावलीकार सुरेश गोलतकर यांनी चितारलेले शिवाजी महाराजांचे तैलचित्रलावण्यात आले होते.मात्र लगतच्या उपहार गृहामुळे ते खराब झाले होते.मुंबई मधिल अनेक बेस्ट आगारात, मंत्रालयाच्या ठिकाणी,बँकांच्या मुख्यालयात तसेच वायंगणी येथील स्वामींच्या मठात,.चिंदर माऊली मंदिर आदिठिकाणी गोलतकर यांनीच चितारलेले शिवाजी महाराजांचे चित्र असल्याने कामगारांच्या आग्रहाखातर पुन्हा सरेश गोलतकर यांच्याकडून शिवाजी महाराजांचे बारा फूट लांबीचे राज्याभिषेकाचे तैलचित्र बनवून स्थापित करण्यात आले. यावेळी उपस्थित बेस्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोलतकर यांच्या कलेचे भरभरुन कौतुक केले.

error: Content is protected !!