अहमदनगरचे अहिल्यानगर:धनगर समाजाकडून शासनाला धन्यवाद

वैभववाडी
महाराष्ट्र शासनाने बारामतीच्या मेडीकल कॉलेज ला अहिल्याबाई होळकर यांच नाव देण्याचा निर्णय घेतला तसेच अहमदनगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांच नाव देण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल कोकण धनगर समाजाच्या वतीने शासनाचे आभार समाज नेते लक्ष्मण शेळके यांनी व्यक्त केले आहेत.
अहिल्यादेवी यांचे कार्य आणि विचार हे समाजाला पुढे नेणारे आहे त्यांचा आदर्श कायम समाजापुढे राहावा समाजाने त्यातून प्रेरणा घ्यावी हा उद्देश अहिल्यानगर या नाम करणाने सार्थ व्हावा अशी अपेक्षाही लक्ष्मण शेळके यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाला समस्त धनगर समाजाच्या वतीने धन्यवाद दिले आहेत.





