हर्षला धुरी आणि प्राची मलये यांना बी.के.मध्ये पैकीच्या पैकी गुण

कुडाळ हायस्कुल ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थिनी
निलेश जोशी । कुडाळ : कराची महाराष्ट्रीयन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळ या प्रशालेच्या हर्षला संदीप धुरी व प्राची प्रेमानंद मलये या दोन विद्यार्थिनींना इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुस्तपालन व लेखाकर्म (बीके) या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवून त्या कोकण बोर्डामध्ये प्रथम आल्या. इयत्ता बारावीचे परीक्षेत हर्षला धुरी हिला ८७.५० तर प्राची मलये हिला ८२ टक्के मार्क पडले .या यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील सहाय्यक शिक्षक व्ही के व्हनमाने यांनी मार्गदर्शन केले .या सर्वांचे संस्थाचालक व प्रशालेचे मुख्याध्यापक दादा शिरहट्टी तसेच ज्युनिअर कॉलेज विभागाचे उपप्राचार्य राजकिशोर हावळ यांनी अभिनंदन केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





