भाजपच्या माध्यमातून चिंदर गावातील विकास कामांचा शुभारंभआचरा–अर्जुन बापर्डेकरचिंदर गाव विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने पुढाकार घेतला आहे.शनिवारी येथीलसातेरी मंदिर पूर्व चिंदर व सातेरी मंदिर पश्चिम अशा दोन्ही रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. पूर्व भाजप नेते मंगेश गावकर व पश्चिम बाली अण्णा पुजारे यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी धोंडू चिंदरकर तालुका अध्यक्ष, भा ज प प्रभारी आचरा संतोष गावकर, प्रभारी सरपंच दीपक सूर्वे, ग्रामपंचायत सदस्यां सौं जान्हवी घाडी ,अरुण घाडी, माजी सरपंच भालचंद्र खोत, पोलीस पाटील दिनेश पाताडे, राजु परब, दादू घाडी, एकनाथ पवार,बूथ अध्यक्ष दिगंबर जाधव, रवि घागरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.गेली दहा वर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्याकामाचा शुभारंभ झाल्यामुळे गावठणवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेशजी राणे यांचे आभार मानले आहेत.
