रेल्वे आरक्षण गैरव्यवहार । खासदार विनायक राऊत यांनी घेतली कोरे एमडी यांची भेट

गणेशोत्सव काळात ३५० गाड्या चालविण्याची मागणी

ब्युरो । मुंबई : गणेश उत्सव 2023 च्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना कोकण रेल्वे तिकीट आरक्षित करताना जो त्रास झाला, त्या अनुषंगाने विचारणा करणे, दलालांना पायबंद करणे आणि अधिकाधिक रेल्वे गणेशोत्सवाच्या दरम्यान सोडणे या विविध विषयाच्या अनुषंगाने खासदार – शिवसेना सचिव विनायक राऊत,, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर व रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीरभाऊ मोरे आणि कोकणवासीय शिष्टमंडळ यांनी काल गुरुवार दि.२५ मे २०२३ रोजी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.संजयजी गुप्ता यांची भेट घेतली.
या भेटीमध्ये सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली, विशेषतः यावर्षी किमान 350 गाड्या गणेशोत्सवाच्या दरम्यान चालविण्याची मागणी प्रामुख्याने केली, तसेच जादा सोडणाऱ्या गाड्या या किमान दोन महिने आगाऊ जाहीर कराव्यात व तिकीट आरक्षणामध्ये कोणतेही गैरव्यवहार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली, अशी माहिती खासदारविनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई.

error: Content is protected !!