प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे जेष्ठ नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण

आचरा–अर्जुन बापर्डेकर
शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे जेष्ठ नागरिकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या ज्येष्ठांसाठी असलेल्या योजनांसाठी वयाच्या दाखल्यांची आवश्यकता असते.यासाठी शासन आपल्या दारी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉ कपिल मेस्त्री यांच्या उपस्थितीत आचरा भागातील ६५वर्षावरील एकूण ८०नागरीकांना वयाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळी, तसेच इतर, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!