सत्यशोधक डाॕ बाबा आढाव: पुस्तकाचे 21 मे रोजी प्रकाशन

21 मे रोजी पुस्तक प्रकाशन
अहमदनगर : डाॕ बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याचा प्रभावी आढावा घेणारे पुस्तक 21 मे रोजी अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे.
महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, अभ्यासक आणि त्याच बरोबर विविध संघटनांतील बाबांच्या सहकाऱ्यांनी बाबांच्या कार्याचा घेतलेला आढावा असे पुस्तकाचे स्वरूप आहे. सुभाष वारे यांची प्रस्तावना असलेले हे पुस्तक छात्रभारतीचे माजी कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस आणि दै. पंढरीभूषण या दैनिकाचे संपादक शिवाजी शिंदे यांनी संपादित व प्रकाशित केले आहे.
पुस्तकासाठी संपर्क
श्रीनिवास शिंदे : 8999529595 येथे करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर ब्युरो न्यूज