काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा !
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची मागणी
वेंगुर्ले पोलिसांना दिले निवेदन
प्रतिनिधी । वेंगुर्ले : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या मनीकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सिंधुदुर्ग काँग्रेसने केली आहे. तसा तक्रार वजा विनंती अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे आज देण्यात करण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पार्टीचे चित्तपुर, (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनीकांत राठोड यांनी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून मनीकांत राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. कर्नाटकात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. श्री. खर्गे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका संभवतो.
भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा उमेदवार निवडणुकीच्या काळात अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष यांना जीवे मारण्याची धमकी देतो ही अत्यंत गंभीर बाब असून मनीकांत राठोडवर क्रिमिनल प्रोसिजर कोड अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा असा तक्रार वजा विनंती अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे करण्यात आला. यावाळी सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, मुंबई शिवडी विधासभचे काँग्रेसचे उमेदवार कोचरा गावचे सुपुत्र उदय फणसेकर, वेंगुर्ला शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर,कोचरा माजी सरपंच सुनिल करलकर, पुरुषोत्तम हंजनकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले की मनीकांत राठोड याचे हे कृत्य हीच भाजपची विचारसरणी आहे. आम्ही म्हणू तसे वागा, आम्ही म्हणू ती पूर्व. आम्ही काही चुकीचे केली तरी त्याला कोणी विरोध करायचा नाही. जो आम्हाला विरोध करेल त्याला संपवून टाकायचे, ही भाजपची विचारसरणी देशाच्या लोकशाहीला घातक आहे. येणाऱ्या निवडणुकांमधून जनताच याला चोख उत्तर देईल, असे इर्शाद शेख यांनी सांगितले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, वेंगुर्ले.