कणकवलीतील विश्रामगृहावर छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तैलचित्राचे अनावरण

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले कार्यकारी अभियंत्यांचे कौतुक

कणकवली सार्वजनिक बांधकाम च्या विश्रामगृहाचा चेहरा मोहरा गेल्या काही दिवसात कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे रुजू झाल्यानंतर बदलून गेला असून, या विश्रामगृहावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तैलचित्रा चे अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या कामाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी श्री. सर्वगोड यांचे कौतुक देखील केले. यावेळी माझी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, कणकवलीचे नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावंत आदी उपस्थित होते. कणकवलीतील विश्रामगृहावर बॅ.नाथ पै यांच्या तैलचित्राचे देखील अनावरण यापूर्वी श्री सर्वगोड यांनी केले होते. कणकवली विश्रामगृहाचा लूक बदलत असताना येथील स्वच्छतेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!