परुळे येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम
ग्रामीण भागातून दुर्वा पावसकरला प्रथम क्रमांक
प्रतिनिधी । कुडाळ : वेंगुले तालुक्यातील परुळे येथील येशू आकाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत पिंगुळी कुडाळ व ग्रामीण भागात दुर्वा पावसकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला
श्रीदेवी येशूआकाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा तीन दिवस चालला होता. वर्धापन दिनाच्या निमित्ताने खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत द्वितीय सोहम जांभोरे सावंतवाडी, तृतीय समर्थ गवंडी रेडी, ग्रामीण भागात द्वितीय वैष्णवी केळुस्कर मूणगी, तृतीय स्वरा पावस्कर यांनी मिळवला.
स्पर्धेचे परीक्षण भूषण तेजम व तेजस पिंगुळकर यांनी केले. विजेत्यांना अनुक्रमे रु पाच हजार रु तीन हजार रु दोन हजार व रु तीन हजार रु दोन हजार रु एक हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षिस वितरण प्रसंगी सुधाकर सांमत कौस्तुभ पेडणेकर हनुमंत तेली गुरुजी, पप्पु पेडणेकर, सरिता खड़पकर, .तानाजी (आना) माडये राजु शिरसाट, नुपुर सामंत, ओंकार देसाई, संदेश करंगुटकर, साईनाथ माडये, सुमन पोयरेकर,लोकमान्य मल्टीपरपज सोसायटी स्टाफ, सुनाद राऊळ, प्रसाद तेली, बाबल चिपकर (कर्ली), बाबु गवंडे, सचिन तेली, बाबु गवंडे, संतोष घारे, संस्कृती कला प्रतिष्ठान परुळेचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.