पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमांवर सिंधुदुर्ग जिल्हा मीडियाचा बहिष्कार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ह्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारचे दौराचे किंवा कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जात नाही.तसेच पालकमंत्री हे कोणताही संपर्क साधत नाहीत.यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्यावतीने पालकमंत्री यांच्या यापुढील सर्व दौरावर व कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचा एकमुखी ठराव कणकवली येथील बैठकीत घेण्यात आला.यामुळे यापुढे पालकमंत्री यांच्या कोणत्याही दौरात व कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला.यावेळी इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे राजन नाईक,महेश सावंत,विकास गावकर,विजय गावकर,विनायक वंजारी,सदाशिव लाड,सुरेश कौलगेकर,समिर महाडेश्वर,उमेश परब,प्रसाद पाताडे,भरत केसरकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!