पिंगुळी येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

आरोग्य साहाय्य समितीचा प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद !

बालरोग तज्ञ डॉ. जयसिंह रावराणे यांचे गौरोवोद्गार

निलेश जोशी । कुडाळ : सध्या आपत्कालीन स्थिती कधीही निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती अचानक अत्यवस्थ होते आणि वेळीच उपचार न मिळाल्यास तिचा प्राण जाऊ शकतो. अशा स्थितीत रुग्ण व्यक्तीला योग्य ते उपचार मिळेपर्यंत आपण प्रथमोचार करून त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. विदेशांत प्रथमोपचाराचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांसाठी त्याचे शिक्षण दिले जाते; मात्र आपल्याकडे तेवढी जागृती झालेली नाही. त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असताना हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीने प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम घेतला, हे कौतुकास्पद आहे, असे उद्गार येथील बालरोग तज्ञ डॉ. जयसिंह रावराणे यांनी येथे काढले.


पिंगुळी येथे २६ एप्रिल या दिवशी या प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले होते. प्रारंभी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते डॉ. रावराणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. रावराणे यांनी व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाच्या छातीवर वारंवार दाब देऊन प्राण कसे वाचवू शकतो (Compression-only life support – cols) याविषयी अत्यंत सोप्या भाषेत तात्विक, तसेच प्रायोगिक भाग शिकवला, तसेच उपस्थितांकडून प्रायोगिक भाग करून घेतला. ५० हून अधिक या वर्गात सहभागी झाले होते. या वेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन डॉ. रावराणे यांनी केले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!