सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाच्या वार्षिक जत्रोसवला भाविकांची अलोट गर्दी

सावंतवाडी प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोस्तव शुक्रवारी थाटात संपन्न झाला. या श्री देव दाळकर देवाच्या वार्षिक जत्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. श्री देव दाळकर देव हा जागृत असून प्रत्येक भक्ताच्या नवसाला पावणार दैवत आहे .या देवाच्या वार्षिक उत्सवाला गोवा तसेच जिल्यातील मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात . श्री देव दाळकर देवस्थान मंडळ मार्फत या देवाच्या वार्षिक उत्सवाचे योग्य नियोजन केले जाते . यावर्षी मोठ्याप्रमाणात भाविकांनि दर्शनाला गर्दी केली होती .

error: Content is protected !!