सेवांगण मालवण येथे खगोलशास्त्रीय कार्यशाळेस प्रारंभ

मालवण : खगोलशास्त्राच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेचा शुभारंभ काल बॅ. नाथ पै सेवांगणाच्या दादा शिखरे सभागृहात झाला.. ग्रह तारे नक्षत्रांची ओळख करून देण्यासोबतच दुर्बीण कशी हाताळावी याचेही प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. खगोलशास्त्र या विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती आयोजक आशिष पेडणेकर यांनी या प्रसंगी दिली. सेवांगणच्या कौटुंबिक सल्ला केंद्राचे ज्येष्ठ समुपदेशक श्री. मनोज उर्फ राजू गिरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी सेवांगणचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर व इतर सदस्य उपस्थित होते. सेवांगण सायन्स क्लब तर्फे सहा दिवसांच्या या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण प्रतिनिधी