देवबाग येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम
प्रतिनिधी । कुडाळ : मालवण तालुक्यातील देवबाग येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली. श्री हनुमान सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, देवबाग हनुमान मंदीराच्या 38 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत दितीय समर्थ गवंडी, तृतीय शंकर गवस, उतेजनार्थ विश्लेषा मंडलिक, मंत्रा कोळबकर यांनी मिळविला. स्पर्धेचे परिक्षण झी मराठी ‘एका पेक्षा एक’ सेलीब्रेटी नितीन जाधव (मुंबई (लालबाग) सागर सारंग, सौ. नमिता गावकर देवबाग यांनी केले. विजेत्यांना अनुक्रमे रु 5023 रु 3023 रु 2023 व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर कुमठेकर, महेश तांडेल, आनंद कुमठेकर तसेच स्पर्धेचे प्रायोजक जीजी चोपडेकर, ओमकार वैगुर्लेकर, तुळशीदास कासवकर ह. भ. प. गुरुजी वैकुठ कांदळगावकर, निखिल कासवकर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन अवधुत (दादा) सातोसकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ .