प्लास्टिक मुक्ती साठी कणकवली नगरपंचायत ची हटके स्टाईल

माऊली वस्तीस तर संघाची अनोखी संकल्पना

मुख्याधिकाऱ्यांकडून या उपक्रमाचे केले कौतुक

कणकवली नगर पंचायत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ,माझी वसुंधरा व DAY NULM माउली वस्तीस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने कणकवली नगर पंचायत येथे प्लास्टिक मुक्त कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गट सदस्यांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या नियोजनासाठी उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत महिला बचत गट सदस्यांनी आपल्या घरातील प्लास्टिक कचरा हा कचऱ्यामध्ये न टाकता तो प्लास्टिक बॉटलमध्ये भरून प्लास्टिक कचरा कमी करण्याचा एक नवा मार्ग सुचविला आहे. या उपक्रमाच्या वेळी साधारण २०० पेक्षा जास्त प्लास्टिक भरलेले बॉटल एकत्र करण्यात आले.प्रत्येकाने अगदी घरातील लहानांपासून ते मोठयांपर्यंत कोणीही सहज हा उपक्रम करू शकतो. या उपक्रमामुळे शहरातील प्लास्टिक बॉटल तसेच प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत होईल.शहरामध्ये कोठे प्लास्टिक विस्कटणार नाही त्यामुळे विस्कटलेले प्लास्टिक जनावरे खाणार नाहीत तसेच प्लास्टिक पाणी अथवा गटारामध्ये जाणार नाही आणि शहराचे विद्रुपीकरण होणार नाही. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण,पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खूप मोठा फायदा होईल.कणकवली शहरातील प्रत्येकाने हे काम जमेल त्या वेळेत,जमेल त्या पद्धतीने होता होईल तेवढे १००% करण्याचा प्रयत्न करूया आणि कणकवली शहर प्लास्टिकमुक्त करूया.हा संदेश या उपक्रमावेळी नगर पंचायतीच्या वतीने देण्यात आला.यावेळी मुख्याधिकारी श्री.अवधूत तावडे,स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत,मनोज धुमाळे ,विभव करंदीकर,राणी लाड,सचिन नेरकर,अमोल भोगले,संदीप मुसळे,सुमित कुबल,माऊली वस्तीस्तर संघ अध्यक्ष दिव्या साळगावकर ,सुचिता सोनी, रुपाली पोयेकर,रोहिणी मलये ,लक्ष्मी गुरव ,नीता बागवे ,संगीता सारंग,सरिता चव्हाण व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!