पिंगुळी येथील कब्बड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावलला विजेतेपद
पिंगुळी गुढीपुर येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाचे आयोजन
पंचक्रोशी फोंडा संघाला उपविजेतेपद
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुला पुरुष गट कबड्डी साखळी सामन्यात लक्ष्मीनारायण वालावल संघाने पंचक्रोशी फोंडावर एकतर्फी विजय मिळविला. अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेश घाडी लक्ष्मीनारायण वालावल याची निवड करण्यात आली.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाच्या वतीने कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने जिल्हास्तरीय निमंत्रित खुला पुरुष गटातील कबड्डी साखळी सामन्याचे प्रथमच आयोजन श्रीदेवी भद्रकालीमंदिर नजीक करण्यात आले होते. या स्पर्धेत तृतीय शिवभवानी सावंतवाडी यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम रु 15 हजार रु 10 हजार रु 5 हजार व भव्य चषक देऊन सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज जिल्हा अध्यक्ष व श्री भगवान रणसिंग मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
वैयक्तिक मध्ये उत्कृष्ट पकड दर्शन मयेकर लक्ष्मीनारायण वालावल, उत्कृष्ट चढाई अमित चव्हाण फोंडा, आदर्श संघ संघर्ष कोचरा यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ठाकर समाजाचे जेष्ठ पदाधिकारी प्रकाश पांगुळ, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे तुषार साळगावकर, विकास ठाकूर, सुधीर गंगावणे, मनोहर ठुबरे, स्पर्धा निरीक्षक राजेश सिंगनाथ, पंचप्रमुख सागर पांगुळ, बाळकृष्ण रणसिंग, सुभाष रणसिंग, रणजित रणसिंग, विठ्ठल सिंगनाथ, राजन सिंगनाथ, भरत ठाकूर, अनुज रणसिंग, कार्तिक रणसिंग, नयन रणसिंग, मंथन रणसिंग, प्रल्हाद रणसिंग, राजाराम पांगुळ, विघ्नेश चव्हाण, पंच प्रीतम वालावलकर, वैभव कोंडसकर, कृष्णा सावंत, दाजी रेडकर, सी ए नाईक, जयेश परब, हेमंत गावडे, अमित गंगावणे, अमोल मराठे, मिलिंद ठूबरे, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना लक्ष्मीनारायण वालावल संघाचा राजू बंगे म्हणाला भगवान रणसिंग मित्रमंडळाने प्रथमच पुरुष गटातील साखळी सामने भरवून कबड्डी स्पर्धेला प्रोत्साहन दिले आहे. आज आम्ही जरी पंचक्रोशी फोडाला पराभूत केले तरी आमच्यासाठी हा संघ आदर्श आहे. जिल्ह्यात आजही कबड्डी मध्ये पचक्रोशी फोंडाचे नांव आहे. पचक्रोशी फोंडाचे चव्हाण म्हणाले येथील कबड्डी खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी श्री भगवान रणसिंग मित्रमंडळ गेली बरीच वर्षे स्पर्धा घेत आहे. भविष्यातही अशा स्पर्धाचे सातत्य ठेवत आम्हा खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे सांगितले. उपांत्य फेरीतले सर्व सामने चुरशीचे झाले. अंतिम सामना वालावलने 19 -13,असा एकतर्फी जिकला. सूत्रसंचालन सागर पांगुळ यांनी केले. स्पर्धा नियोजन म्हणून बाळकृष्ण रणसिंग यांनी काम पाहिले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.