मूळपुरुष देवस्थानसाठी प.स. स्वनिधी देऊ – विजय चव्हाण
मुळदे येथील मूळ पुरुष देवस्थानचा दुसरा वर्धापन दिन थाटात संपन्न
प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील मूळदे येथील मूळपुरुष देवघरासाठी मंदिर व अंतर्गत दुरुस्तीसाठी पंचायत समितीचा स्वनिधी देऊ असे प्रतिपादन पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मूळदे येथील मूळ पुरुष देवस्थानच्या दुसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात रविवारी रात्री केले
श्री गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुळदे – चव्हाणवाडीच्या वतीने
मुळपुरूष देवघर वर्धापन दिनानिमित्त २३ एप्रिलला श्री सत्यनारायण महापुजा तसेच सायंकाळी संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांच्या हस्ते गटविकास अधिकारी (वर्ग-१ उच्चस्तर) पंचायत समिती कुडाळ विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी चर्मकार समाजाचे पदाधिकारी के टी चव्हाण मनोहर सरमळकर राजन वालावलकर सौ जाधव सरपंच मूळदे
श्रीम. संध्या मुळदेकर उपसरपंच सौ. अपुर्वा पालव सौ. अश्विनी पालव सौ. वैशाली पालव पोलीस पाटील रामदास चव्हाण शिवाजी पालव श्री गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुळदे – चव्हाणवाडी अध्यक्ष मधुकर चव्हाण उपाध्यक्ष विश्राम मुळदेकर सचिव
सोमा मुळदेकर प्रा नितीन बांबर्डेकर सुभाष बांबूळकर सोनाली चव्हाण रत्नदिप जाधव संजय पालव जेष्ठ ग्रामस्थ श्री धुरी लक्ष्मण पालव नागेश जाधव ग्रामसेवक तोरस्कर सोनू चव्हाण माजी सरपंच गुरुनाथ चव्हाण मोहन चव्हाण विकास मुळदेकर सखाराम चव्हाण गणपत चव्हाण संजय मुळदेकर पांडुरंग चव्हाण लक्ष्मण म्हापणकर लवु चव्हाण भास्कर चव्हाण सुहास चव्हाण स्वप्नील म्हापणकर सचिन चव्हाण संतोष चव्हाण तसेच श्री गणेश स्वयंसहाय्यता महिला गट श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला समूहचे पदाधिकारी आदी उपस्थित होते
गटविकास अधिकारी श्री चव्हाण म्हणाले मूळदे गावच्या सर्वागीण विकासासाठी निश्चितच प्रयत्न केला जात आहे गावात पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली आहेत या गावांमध्ये महत्त्वाच्या विकासकामांमध्ये साकव प्रस्ताव गेले पाच आला नाही निधी असूनही हा प्रश्न रखडलेला दिसून येतो स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी या ठिकाणी संघर्ष करण्याची गरज नाही हा प्रश्न त्या त्या पातळीवर सोडण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल तसेच दलित वस्ती सुधार अंतर्गत कुडाळ तालुक्याला पावणे चार कोटीचा निधी आला असून या निधीतून कुडाळ तालुक्यातील वस्ती सुधारण्याची विविध कामे मार्गी लागतील ही सर्व कामे होत असताना कामाचा दर्जा हा महत्त्वाचा आहे असे सूचित केले श्री मूळपुरुष देवघराच्या निमित्ताने मूळदे गावाने अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे या उपक्रमात सर्व जातीचे लोक समाविष्ट झाले हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे सांगितले सुजित जाधव यांनी मुळदे गावात स्वतःची स्मशानभूमी असणे गरजेचे आहे येत्या महिन्याभरात हा प्रश्न मार्गी निघाला नाही तर संपूर्ण चर्मकार समाज आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला समाजाचे मार्गदर्शक के टी चव्हाण यांनी दुसऱ्याचा द्वेष कधी करू नका आपणाकडून जे होत असेल ते आपल्या परीने करायचे असे सांगत त्यांनी संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपले विचार व्यक्त केले प्रा नितीन बाबर्डेकर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास सांगितला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष मधुकर मुळदेकर व आभार रामदास चव्हाण यांनी मानले
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.