कणकवलीतील प्लॅस्टिक पिशव्या बाळगणाऱ्या विक्रेत्यांना 4 हजार रुपयांचा दंड

कणकवली नगरपंचायत ची धडक कारवाई

मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा कारवाईचा दिला आहे इशारा

कणकवली नगरपंचायत ने आज मंगळवार आठवडा बाजारा दिवशीच अचानक राबवलेल्या प्लास्टिक पिशव्या निर्मूलन मोहिमेत तब्बल 16 किलो हुन जास्त प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तर जवळपास दहाहून अधिक विक्रेत्यांकडून 4 हजार 100 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. कणकवलीक नगरपंचायतने यापूर्वी देखील अनेकदा प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमे करता कडक उपाय योजना राबवल्या होत्या. त्यानंतर अनेकदा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली होती. परंतु वारंवार सूचना देऊनही या विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने अखेर आज मंगळवारी आठवडा बाजार दिवशी भाजी, फळ, फुले, मासे विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड, सतीश कांबळे, पूजा तांबे, रमेश तांबे आदींनी या कारवाई सहभाग घेतला. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिला.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!