श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल रोजी
प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली – भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ रोजी सकाळी ८ वाजता लघुरूद्र, अभिषेक, महापूजा, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती, प्रसाद, सायंकाळी ६ वाजता मकरंद देसाई (तेंडोली) चे किर्तन, रात्री ८.३० वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.
29 रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी 7 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक 7000 रुपये, द्वितीय 5000 रुपये, तृतीय 2000 रुपये, चतुर्थ 1000 रुपये. सर्व विजेत्यांना चषक व स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धेकांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या वीस स्पर्धाकांना प्रवेश दिला जाईल. अधिक माहितीसाठी मोबाईल सिद्धेश राऊळ – 8605265019 व शशांक राऊळ यांच्याशी संपर्क साधावा.
३० रोजी सकाळी 8 वाजता लघुरूद्र, अभिषेक, १० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, नैवेद्य, दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता रामकृष्ण हरी संगीत भजन संस्कार वर्ग (तेंडोली) चे भजन, रात्री ८ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता पालखी सोहळा, १० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अनलादेवी सेवा मंडळ तेंडोली यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.