नगरपंचायत च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत राष्ट्रवादी नेते, नगरसेवक अबीद नाईक यांनी केला ईद साजरा

अनोख्या पद्धतीने ईद साजरा केल्याने स्वच्छता कर्मचारी सुखावले

रमजान हा मुस्लिम बांधव धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. रमजान ईद चा सण हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक अबिद नाईक यांनी रमजान ईद नगरपंचायत च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत कणकवली येथील आपल्या निवासस्थानी साजरी केली. अबिद नाईक यांनी कणकवली नगरपंचायत च्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना शीर कुर्मा देत त्यांचा आदराने पाहुणचार केला. सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत स्वतः ही शिर कुर्मा चा आस्वाद घेतला. यावेळी संदीप नलावडे, अनिस नाईक, सुयोग टिकले, जावेद शेख आदी उपस्थित होते. सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी भेटवस्तू देत अबिद नाईक आणि नाईक कुटुंबियांना ईद मुबारक म्हणत ईद च्या शुभेच्छा दिल्या. अबिद नाईक यांनी घरी बोलावत ईदनिमित्त दिलेल्या कौटुंबिक सदभावनेच्या सलगीने सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कणकवली नगरपंचायत चा सफाई कर्मचारी हा शहर स्वच्छतेचा दूत आहे. या स्वच्छता दूतांचा ईद निमित्त माझ्या घरी पाहुणचार करता आला याचे समाधान असल्याची भावना अबिद नाईक यांनी व्यक्त केली.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!