तळवडे नेमळे रस्ता नूतनीकरण करणे या तीन किलोमीटर च्या कामासाठी 1 कोटी 40 लाख निधी मंजूर

शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थित तळवडे सरपंच सौ. वनिता मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन
महाविकास आघाडी सरकारच्या अर्थ संकल्प 2022 मधून तत्कालीन मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब व अर्थमंत्री अजित पवार, मंत्री तथा सावंतवाडी विधान सभा मतदार संघ आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने तळवडे नेमळे रस्ता नूतनीकरण करणे या तीन किलोमीटर च्या कामासाठी 1 कोटी 40 लाख निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थित व तळवडे सरपंच सौ. वनिता मेस्त्री यांच्या हस्ते आज पार पडले.
या वेळी या भूमिपूजन सोहळयावेळी शिवसेना शाखाप्रमुख अनिल जाधव, तळवडे सोसायटीचे चेअरमन श्री. आपा परब, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र काजरेकर, उपसरपंच गौरव मेस्त्री, निरवडे ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, ग्रामपंचायत सदस्य सौ. परब अर्बन बँक चेअरमन श्री. विलास परब, महिला विभाग प्रमुख कु. नमिता सावंत, उपविभाग प्रमुख श्री. प्रशांत बुगडे, काशी कुंभार, बबन परब, बबन गावडे, गिरीश शिरोडकर, सोसायटी संचालक सुरज परब, श्री. आपा नागवेकर, रवींद्र सावंत, रविंद्र वेंगुर्लेकर, सोसायटी संचालक चंदू टेलर, सुभाष रेडकर, ज्ञानेश्वर नागवेकर व्यापारी संघ अध्यक्ष बाबा परब, राजन कास्टे, राजन कोरगावकर,रोहित परब, रिक्षा युनियन चे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधि