कुडाळ MIDC मध्ये भीषण अपघात

मिक्सर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू!

येथील एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाला जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास झाला.
एमआयडीसी मधून कुडाळच्या दिशेने हे मिक्सर वाहन येत होते. तेथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर मिक्सर वाहन तेथील रस्त्यालगत पलटी झाले. यात चालक केबिन मध्येच अडकून राहीला. गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच कुडाळ पोलिसांसह अग्निशमन प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत केबीनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

error: Content is protected !!