कुडाळमध्ये उद्या जिल्हास्तरीय ‘करिअर कट्टा’ कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘करिअर कट्टा’ एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची माहिती मिळावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही कार्यशाळा शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे राहणार आहेत. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तुळशीदास गावडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) भूषण कोळेकर तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे ‘करिअर कट्टा’ समन्वयक प्रा. अजित कलंबीटकर करणार असून प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अजित दिघे करणार आहेत. महाविद्यालयातील ‘करिअर कट्टा’ सदस्य कु. अनुुष्का परब मनोगत व्यक्त करणार असून आभार महाविद्यालयातील ‘करिअर कट्टा’ समन्वयक प्रा. उमेश कामत मानणार आहेत.
या जिल्हास्तरीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन करिअरविषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!