यंग स्टार मित्र मंडळ कणकवली च्या वतीने श्रावण मेळा चे आयोजन

वेशभूषा स्पर्धा, भावगीत भक्तीगीताच्या सह अन्य कार्यक्रमांचे आयोजन

यंगस्टार मित्रमंडळ कणकवली आयोजित श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात चालू होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्रावण मेळा आयोजित करण्यात आला आहे.
त्यानिमित्त शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता रानभाजी याची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता लहान मुलांसाठी ( पाचवी पर्यंत ) वेशभूषा स्पर्धा व त्यानंतर भावगीत आणि भक्तीगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यंगस्टार मित्रमंडळाच्या च्या वतीने करण्यात येत आहे.

यात विजेत्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी पारितोषिके देऊन स्पर्धकांना गौरवण्यात येणार आहे.

तरी स्पर्धकांनी दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत आपली नावे सौ. प्रियाली कोदे ( 9420524203) व
साक्षी वाळके (7058084214) यांच्या जवळ द्यावीत.

स्थल :- भालचंद्र महाराज संस्थान कणकवली

error: Content is protected !!