‘गुरुवंदना’तून रंगला भक्तिसंगीताचा सुरेल सोहळा!

नमो शारदा संगीत क्लासेसचा उपक्रम उत्साहात

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

संगीत रत्न, भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा संचलित ‘नमो शारदा संगीत क्लासेस’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला स्थानिक नागरिकांसह संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सोहळ्याचे उद्घाटन नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार गुरुवर्य रामचंद्र परब बुवा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना रुपेश पावसकर म्हणाले, “गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा मुख्य पाया आहे. संगीतासारख्या पवित्र कलेच्या माध्यमातून बालकांवर आणि युवा पिढीवर उत्तम संस्कार रुजविण्याचे कौतुकास्पद कार्य नमो शारदा संगीत क्लासेस करत आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा संगीतमय आणि भजनी परंपरेने नटून निघेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच क्लासेसच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या संगीत सोहळ्याला नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, गुरुवर्य रामचंद्र परब बुवा, बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर, उपसरपंच दीपक सावंत, बिबवणे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजन मांजरेकर, धोंडू सातार्डेकर, अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार मंडळाचे मालक झीलू गोसावी, संजय सावंत, पांडुरंग सावंत-मांगले बुवा, मकरंद लालन, ललिता लालन, नितीन शेणई, बंड्या कोरगावकर, विश्राम कदम, विजय तावडे आणि सुभाष परब आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरु-शिष्य परंपरेचा गौरव, भक्तिसंगीताची साधना आणि नव्या पिढीवर संस्कार असा त्रिवेणी संगम या ‘गुरुवंदना सोहळ्या’त अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाला संगीतप्रेमींची मोठी उपस्थिती लाभल्याने संपूर्ण परिसर भक्तिसंगीताच्या स्वरांनी भारावून गेला.

error: Content is protected !!