दारिस्ते येथे कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील यांचा जलसंधारणासाठी पुढाकार

प्रांताधिकारी मा.श्री जगदीश कातकर यांचा प्रत्यक्ष सहभाग;पोलीस पाटील यांच्या उपक्रमाचे केले कौतुक.
कणकवली : मयूर ठाकूर
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे,भूजलपातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे महत्त्वाची ठरत आहेत.याच सामाजिक बांधिलकीतून कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील यांनी एकत्र येत दारिस्ते येथे वनराई बंधारा उभारला.या उपक्रमात कणकवलीचे प्रांताधिकारी माननीय श्री.जगदीश कातकर यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.त्यांनी दारिस्ते येथे प्रत्यक्ष भेट देऊन वनराई बंधाऱ्याची पाहणी केली तसेच बंधारा उभारणीच्या कामात स्वतः सहभागी होत सर्व पोलीस पाटील यांचा उत्साह वाढविला.यावेळी प्रांताधिकारी श्री.जगदीश कातकर यांनी पोलीस पाटील यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन जलसंधारणाचे काम हाती घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.शासकीय यंत्रणेसोबतच स्थानिक नागरिक आणि विविध घटकांनी लोकसहभागातून अशा प्रकारची कामे केल्यास जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.वनराई बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा परिसरातील जलसाठा व भूजल पुनर्भरणासाठी उपयोग होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शेती,विहिरी तसेच परिसरातील पाण्याच्या उपलब्धतेसाठी या उपक्रमाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.
या उपक्रमामध्ये मंडळ अधिकारी किरण गावडे,ग्राम महसूल अधिकारी शुभम भालेराव,ग्रामसेवक पांडुरंग तांबे तसेच उदय सावंत(कासरल),नारायण गावकर(माईन),विश्वास सावंत(डामरे),अनंत राणे (वाघेरी),हेमंत सावंत(दारीस्ते),सिद्धेश मेस्त्री(फणसनगर),विक्रांत ठाकूर(हळवल),तुषार राणे )(रामेश्वरनगर भिरवंडे),गणेश वाळके(शास्त्रीनगर),प्रकाश कांबळे(सांगवे),रवींद्र जाधव(पिसेकामते),दीपक जाधव(रांजणगाव),मयूर ठाकूर(शिवडाव),सचिन वारंग(दारिस्ते),शैलेश सावंत(दारिस्ते),योगेश कदम(दाबगाव) या सर्व पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला.






