आमदार प्रमोद जठार यांच्याकडून कणकवली शहरातील कामांकरिता वीस लाखांचा निधी मंजूर

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांच्या मागणीनुसार दिली निधीला मंजुरी
शहरातील या भागांमधील जनतेतून सातत्याने होत होती मागणी
शिशिर परुळेकर यांनी मानले आमदार प्रमोद जठार यांचे आभार
कोकण विभागाचे भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांच्या शिफारशीनुसार कणकवली शहरात 20 लाखाची विकास कामे मंजूर झाली आहेत.
महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान अंतर्गत येणाऱ्या विकास निधीतून आमदार प्रमोद जठार यांच्या शिफारशीनुसार कणकवली शहरातील वार्ड क्रमांक 10 मध्ये जनतेच्या मागणीनुसार चिंतामणी अपार्टमेंट येथे 15 लाख रुपयाचे बंदिस्त गटार व मसुरकर कीनई रोड येथे 5 लाख रुपये हायमास्ट मंजुरीचे पत्र जिल्हा नियोजन कडून कणकवली नगरपंचायत ला प्राप्त झाले आहे. कणकवली शहरातील या विकास कामांकरिता माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी मागणी केली होती. शहरातील या भागांमधील जनतेमधून श्री परुळेकर यांच्याकडे सातत्याने मागणी होत असल्याने याबाबतचा पाठपुरावा श्री परुळेकर यांनी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे केला होता. त्यानुसार ही कामे मंजूर झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले आहे.






