कवठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याची भेट

संजय करलकर यांच्या पुढाकारातून उपक्रम

रुपेश पावसकर यांच्या हस्ते साहित्य वाटप

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय करलकर यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी आणि भविष्यात देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांनी कवठी युवक मित्र मंडळ तसेच जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचे आभार मानले.
कार्यक्रमास कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय करलकर, लाजरी ग्रुप कुडाळचे अध्यक्ष राजू पाटणकर, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, सरपंच स्वाती करलकर, उपसरपंच रुपेश वाड्येकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनिष वाड्येकर, उपाध्यक्ष जोशी मॅडम, सामाजिक कार्यकर्ते मंगेश बांदेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!