व्यसनांपासून दूर राहा, करियरवर लक्ष केंद्रित करा !

पुष्पसेन ज्ञानपिठात व्यसनमुक्तीवर समाजकल्याण विभागाकडुन व्याख्यान

सेवा संकल्प अभियानांतर्गत सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय , सिंधुदुर्ग यांच्या वतीने वाडी हुमरमळा येथील श्री पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयात ‘व्यसनमुक्त भारत’ या विषयावर जागृकता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तरूणांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्य, शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यसनाधीनता ही समाजा समोरील गंभीर समस्या असून तिचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्या बरोबरच कुटूंब व समाजाच्या प्रगतीवरही होतो. तरूणांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्य, शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विविध प्रकारची व्यसने, त्यांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेची कारणे, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची भुमिका आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण सिंधुदुर्ग जिल्हा विशेष अधिकारी तुषार दळवी यांनी केले तर सुत्रसंचलन आनंद कर्पे यांनी केले. संस्था परिसर संचालिका सौ नुतन परब, फार्मसी प्राचार्य डॉ.युवराज पांढरे, नर्सिंग विद्यालय प्राचार्य ओंकार गरड,कृषी महाविद्यालय प्राचार्य पांडुरंग लंगुटे, महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थींनी उपस्थित होते.

error: Content is protected !!