कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात

विद्युत जनीत्र आणि उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण होणार

८.५० कोटीच्या निधीला औद्योगिक महामंडळाची मंजुरी.

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात निघाला असून विद्युत जनीत्र व उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ८.५० कोटीच्या निधीला औद्योगिक महामंडळाची मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी दिली.
कुडाळ औद्योगिक वसाहत स्थापन होवून सुमारे ३५ वर्षाहुन अधिक काळ उलटला मात्र ही वसाहत म्हणावी तशी विकसीत झालेली नाही. याची अनेक कारणे असली तरी मुलभुत गरज असणाऱ्या सुविधांचा अभाव हे त्यातील महत्त्वाचे कारण होते. रस्ते, पाणी व विज या व्यवस्था महामंडाने उपलब्ध करुन देणे अभिप्रेत असते मात्र उपन्न आणि खर्च याच्या घातल्या जाणाऱ्या गणितात या वसाहतीचे विशेष उत्पन्न नसल्याने पायाभूत सुविधाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देताना जमेल तेवढी काटकसर केली जात होती. परीणामता: अलिकडे पर्यंत अनेक भागात निट रस्ते नव्हते तर पाणी ऐन मोसमात तुटवडा जाणवत होता. गेल्या वर्षभरात या सर्व समस्या असोसिएशनने सातत्यपुर्ण पाठपुरावा केल्याने सुटु लागल्या आहेत. कुडाळ एम.आय.डी.सी. असोसिएशन गेली अनेक वर्षे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्या प्रयत्नांना आता खरे यश येवू लागले आहे.
पण उद्योजकांच्या जीवनातील महत्वाची ठरणारी जीवनदायीनी म्हणजे विज जी मिळविण्यासाठी उद्योजकाला मोठी यातायात करावी लागत होती. अलिकडेच सुधारित वितरण क्षेत्र योजना आर.डी.एस.एस. अंतर्गत स्वतंत्र सबस्टेशन मान्यता मिळवण्यात संघटनेला यश आले आहे. तसेच या औद्योगिक वसाहतीतील जिर्ण झालेले पथदिवे व काळोखाचे साम्राज्य असल्याने होणाऱ्या अनैतीक प्रकारांना आळा घालण्यासाठी असोसिएशनने महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधल्यानंतर सुमारे ६.५० कोटी रुपयाच्या खर्चात या अगोदरच मान्यता दिली आहे. या औद्योगिक वसाहतीचा आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे सुक्ष्म उद्योजकाला विद्युत सेवा मिळविण्यासाठी त्याच्या एकुण प्रकल्पापेक्षाही विद्युत जोडणीसाठी जास्त खर्च करावा लागत होता. यामुळे नव उद्योजक मेटाकुटीस येत होता. असोसिएशनने यासाठी गेल्या वर्षभरात उद्योगमंत्री व महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शिष्टमंडळासह भेट घेवून या समस्याचे गार्भीर्य त्यांच्या समोर मांडले व याची परिणीती म्हणून कुडाळ औद्योगिक वसाहतीला विद्युत जनीत्र (Transformer HT / LT Line) करीता मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ८.५० कोटीच्या खर्चास मान्यता दिली असून उद्योजकांच्या मुलभुत समस्येचे खऱ्या अर्थाने यामुळे निराकरण झाले आहे.
असोसिएशन अध्यक्ष श्री. मोहन हाडावडेकर यांनी याबद्दल उद्योग मंत्री मा. उदय सामंत व महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बीपीन शर्मा यांचे या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल व सहकार्याबद्दल सर्व उद्योजकांच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!