तेंडोली रवळनाथ पंचातानाचा वर्धापन दिन सोहळा
दि. २१ ते २५ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा २१ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
21 रोजी सकाळी १० वाजता दांडेकर मंदिरात दर्शन मूर्तीचे आगमन, सायंकाळी ४ वाजता गाऱ्हाणे घालणे,पाषाणे सजविणे, तरंगांना वस्त्रलंकार,६ वाजता श्री म्हाळसाई (बागलाची राई) मंडळाचे भजन, ७.३० वाजता तेंडोलकर दशावतार मंडळ ( झाराप) चे नाटक, रात्री १०.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम.
२२ रोजी सकाळी ७.३० वाजता देवता वंदन, संकल्प पुण्याहवाचन, श्री देव रवळनाथ चरणी ऋग्वेद शाकलसंहिता अभिषेक महापूजा, श्री महादेव चरणी लघुरूद्र,श्री गणपती चरणी अथर्वशीर्ष मंडलाभिषेक पूजा, दुपारी १.३० वाजता नेवैद्य आरती, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, ९ वाजता पिंपळेश्वर कला मित्रमंडळ ( तेंडोली वरची आदोस ) यांची “आठवणीतील शाळा” ही एकांकिका, १० वाजता रवळनाथ मंडळाचे “हेच माझे दैवत ” दोन अंकी नाटक होणार आहे.
23 रोजी सकाळी ७.३० वाजता श्री जगदंबा सातेरी चरणी नवचंडी, कुमारी पूजन, कुष्मांडबळी महापूजा, श्री देव दांडेकर चरणी लघुरूद्र, दुपारी १.३० वाजता नेवैद्य आरती, सायंकाळी ४ वाजता प्रथमेश मेस्त्री व सहकारी यांचे दशावतार नाटक, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, 9 वाजता शिवप्रेमी मित्रमंडळ (तेंडोली) यांची “इच्छामरण” ही एकांकीका, 10 वाजता कलांकुर ग्रुप आंबेडकर नगर बालकलाकार यांची “विठ्ठल विठ्ठल “ही एकांकीका, ११ वाजता कलांकुर ग्रुप आंबेडकर नगर यांची “व्हय ती जिती हाय” ही एकांकीका होणार आहे.
२४ रोजी सकाळी ७.३० वाजता भद्रकाली चरणी – श्रीसूक्त १५०० आवर्तने जप, वेतोबा चरणी लघुरूद्र, दुपारी १ वाजता महाप्रसाद, २.३० वाजता रामकृष्ण हरी संगीत संस्कार वर्ग (तेंडोली) यांचा संगीत कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) चे नाटक, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, रात्री 9 वाजता कलांकुर ग्रुप आंबेडकर नगर यांची “दादरा” (देसरूड) ही एकांकीका होणार आहे.
२५ रोजी सकाळी ९ वाजता स्वारीचे सातेरी मंदिरात मांडावर आगमन आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तेंडोली यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.