नेरूर ते चेंदवण, वालावल, कवठी रस्ता निदान चतुर्थी पुर्वी डागडुजी करा

प स सदस्य सौ अर्चना बंगे यांची मागणी

नेरुर-वालावल चेंदवण कवठी पर्यंत रस्त्याची चाळण झाली असुन निदान गणेशोत्सवापुर्वी डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ बंगे म्हणतात, या रस्त्यावर आंदोलन छेडुन झाले तरी काही उपयोग नाही. परंतु या रस्त्याची झालेली चाळण त्यामुळे रीक्षा व्यवसायीक तसेच टु व्हीलर, फोरव्हिलर वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यामुळे निदान गणेत्शावापुर्वी डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी कळकळीची मागणी सौ बंगे यांनी केली आहे

error: Content is protected !!