आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा सोहळा उत्साहात संपन्न

कणकवली:मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे प्रशालेत भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत पार पडले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेतील डिसिप्लिनच्या चार हाऊसच्या विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीत सादर झाली.या देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम जागृत करून सर्वांनाच या गाण्यावर ठेका धरायला लावला त्यानंतर प्रशालेची विद्यार्थिनी कु.प्राप्ती राणे आणि ज्यूनियर कॉलेजची विद्यार्थिनी कु.अंतरा गुडेकर यांनी स्वातंत्र्य दिनाची महत्व आपल्या भाषणांमध्ये सांगितले आयडियल स्पेशल स्कूलच्या विद्यार्थी श्रेय रावराणे याने देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थित सर्वाना मंत्रमुग्ध करून सोडले. शिस्त एकाग्रता यांवर आधारित असे कवायत सादर झाली आणि बहारदार आणि उत्साह पूर्ण अशा देशभक्तीपर गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर शिक्षण संस्थेच्या खजिनदार सौ.शितल सावंत मॅडम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सल्लागार डी पी तानवडे सर संस्था सदस्य यज्ञेश शिर्के सर त्याचप्रमाणे विलास कोरगावकर सर आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई मॅडम शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी कीर्ती मुसळे मॅडम, गुरुकुल अकॅडमी चे मुकुंद चिकोडी सर आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज चे कॉर्डिनेटर निलेश घेवारी सर सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख वैष्णवी मोर्वेकर मॅडम आदी मान्यवर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक,माजी विद्यार्थी तसेच प्रशालेतील विद्यार्थी आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रशालाचे सहाय्यक शिक्षक हेमंत पाटकर सर यांनी केले

error: Content is protected !!