अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात पाट हायस्कूलचे घवघवीत यश

कु. भक्ती योगेश तेली-कोचरेकर तालुकास्तरावर प्रथम

गट साधन केंद्र येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यातील स्पर्धेत एस. के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल. देसाई विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी भक्ती योगेश तेली -कोचरेकर हिने भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ भवितव्य आणि आव्हाने या विषयावर उत्तम सादरीकरण व वक्तृत्व सादर करून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या स्पर्धेत १७ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .या विद्यार्थिनीला प्रशालेतील नंदिनी बुरुड, मारुती सांगळे ,विनायक कांबळे ,सिद्धी चव्हाण या विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व संस्था पदाधिकारी ,प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर ,पर्यवेक्षिका अंकिता मोडक ,सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!