दुर्गंधी ! पणदूरमध्ये महामार्गानजीक अंड्यांचा खच

मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. कुडाळकडे जाताना पणदूर ब्रीज सोडल्यानंतर हि अंडी टाकण्यात आली आहेत. रस्त्यालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात फुटलेली अंडी टाकण्यात आल्याने या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. घटनास्थळी दुर्गंधी निर्माण होत आहे. अंडी वाहतूक करणा-या वाहनाला अपघात झाला की कोणी अज्ञाताने अंडी फेकून केली, याबाबत कोणतीही माहीती मिळालेली नाही. मात्र या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.






