कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी प्रदीप मांजरेकर बिनविरोध

काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून आहेत कार्यरत
उर्वरित कार्यकारणी मध्ये “यांचा” आहे समावेश
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासह अन्य संचालक ही बिनविरोध झाले असून यामध्ये अशोक पराडकर, तुळशीदास रावराणे, सदानंद सर्वेकर, प्रसाद पाटकर, मकरंद जोशी, सच्चिदानंद गोलतकर, श्रद्धा सावंत, सुजाता देसाई, अजय आकेरकर, सूर्यकांत बोडके, किरण रावले, दिलीप तवटे, आनंद ठाकूर, संतोष राऊळ, मंगेश ब्रह्मदडे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





