पावणादेवी दुग्ध संस्था वाघेरीचे चेअरमन संतोष राणे यांचे सदस्यत्व पद रद्द

अनंत राणे यांनी याबाबत केली होती तक्रार

विकास संस्था, सरपंच पदा पाठोपाठ संतोष राणे यांच्या चेअरमन पदाला देखील धक्का

पावणादेवी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था चे चेअरमन संतोष राणे हे कर्ज थकबाकीदार असल्याचा आरोप करत संस्थेचे सभासद अनंत राणे यांनी केलेल्या तक्रारीनुसार संतोष राणे यांचे पावणादेवी सहकारी दूध संस्थेचे समिती सदस्य पद बंद करण्यात आल्याचे आदेश सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप यांनी दिले आहेत. त्यामुळे यापूर्वी वाघेरी सरपंच, विकास संस्था व त्यानंतर आता ही कारवाई झाल्यानंतर आता संतोष राणे यांना अजून एक धक्का बसला आहे.
याबाबत दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, लिंगेश्वर विकास सोसायटीचे अल्पमुदतीचे कर्ज ऊस पिक कर्ज व खावटी कर्ज यांच्या रकमा थकबाकी असल्याचे या आदेशात म्हटले आहे. याप्रकरणी अनंत राणे यांच्या तक्रारीनंतर संतोष राणे यांचे म्हणणे घेण्यात आले व त्यानुसार निष्कर्ष काढत असताना सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप यांनी एकूण पाच प्रकरणात संतोष राणे यांची थकबाकी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते सदस्य म्हणून पात्र ठरत नसल्याचा निष्कर्ष या आदेशात काढला आहे. तसेच लिंगेश्वर विकास संस्थेचे थकबाकीदार असल्याबद्दलही त्या संस्थेचे सदस्यत्व बंद केले आहे. दरम्यान संतोष राणे ही थकबाकीदार असल्याने त्यांचे समिती सदस्यत्व बंद करण्यात आलेल्या आदेश श्री धुळप यांनी पारित केले आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!