शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे नेत्रदीपक यश

कणकवली/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक विभागात कु.आरोही कपिल दळवी ही ग्रामीण सर्वसाधारण मधून तालुक्यात चौथी आणि जिल्ह्यात नववी आली आहे. तर रिद्धी श्रेयस तायशेटे हिने ग्रामीण सर्वसाधारण विभागातून तालुक्यात सातवा तर जिल्ह्यात 33 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच पूर्व माध्यमिक विभागात कु.गौरेश श्रेयस तायशेटे याने राष्ट्रीय ग्रामीण विभागात जिल्ह्यात तिसरा तर तालुक्यात पहिला आलेला आहे. आणि कु. सार्थक दत्तात्रय मिठबावकर याने ग्रामीण सर्वसाधारण विभागातून जिल्ह्यात 39 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर कोषाध्यक्ष शीतल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.






