कविलकाटे शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

नगरसेवक विलास कुडाळकर यांच्याकडून वह्या वाटप

कुडाळ शहरातील कविलकाटे येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवावेळी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. तसेच यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या किंजवडेकर यांचा सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला.
कुडाळ शहरातील कविलकाटे पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव झाला. या स्वागत कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका ज्योती जळवी, स्थानिक प्राधिकरण सदस्य आफ्रीन करोल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी काळप, मुख्याध्यापक सौ माधुरी राणे, शिक्षिका जोत्स्ना चिंदरकर, समृद्धी नांदोसकर, शिक्षक गौरव नाईक आदी उपस्थित होते. या स्वागत उत्सव कार्यक्रमाविषयी पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसह सातवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटप करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये नगरसेवक विलास कुडाळकर यांनी वह्या वाटप केले. तसेच सामाजिक संस्थांनी वह्या वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव नाईक यांनी केले.

error: Content is protected !!