कणकवली मध्ये नाईक पेट्रोलियम वागदे येथे CNG पंप सुरू होणार

उद्या सीएनजी पंपाचे उद्घाटन
सीएनजी वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मार्फत CNG पंप नाईक पेट्रोलियम वागदे येथे मंगळवार दिनांक १६ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सुरू करण्यात येणार आहे. नाईक पेट्रोलियम वागदे यांच्या व्यवस्थापन च्या वतीने ही माहिती देण्यात आली. तरी यावेळी CNG ग्राहक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाईक पेट्रोलियम व्यवस्थापनाने केले आहे . कणकवली शहरात सीएनजी पंपा करिता मंजुरी मिळाल्यानंतर कणकवलीत अनेक जणांनी सीएनजी वाहने खरेदी केली होती. सध्याच्या स्थिती सीएनजी करिता लागणारी रांग पाहिली असता कणकवलीत अजून सीएनजी ची आवश्यकता होती. नाईक पेट्रोलियम च्या वतीने हा सीएनजी पंप सुरू केला जात असल्याने आता सीएनजी वाहनधारकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.





