जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडून मुलांचे स्वागत

नेरूर, कवठी, वालावल येथील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना भेटी

आज जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा पहिला दिवस आणि यानिमित्ताने मुलांचे स्वागताच्या कार्यक्रमाला नेरुर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी नेरुर केंद्र शाळा क्रमांक 1, कवठी शाळा नंबर 1, नेरुर सिरसोसवाडी, वालावल पूर्व शाळा, कलेश्वर विद्या मंदिर नेरूर हायस्कूल इत्यादी जिल्हा परिषद शाळा यांना भेटी देऊन मुलांना विविध प्रकारची झाडे देऊन मुलांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेतील शाळेत जे शिक्षण दिले जाते ते खरोखरच उपयुक्त असून मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक क्षेत्राचा व सामाजिक क्षेत्रातील पाया आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबरच सामाजिक व व्यावसायिक ज्ञान दिले जाते, त्यामुळे या ठिकाणचे विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रात नावारूपास आलेले आपल्याला पाहायला मिळतात. शैक्षणिक क्षेत्रात कुठलीही अडचण आल्यास आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून सर्व शाळांना नेहमीच सहकार्य करू, अशी ग्वाही देऊन सर्वांचे स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नेरूर येथे केंद्र प्रमुख चव्हाण सर, सरपंच भक्ती घाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गायत्री मेस्त्री, आनंद नेरुरकर, ग्रामपंचायत सदस्य अनुजा नेरुरकर व ग्रामस्थ उपस्थित होते. तर कवठी येथे पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश बांदेकर, सरपंच सौ स्वाती करलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीष वाडयेकर, कुणाल बांदेकर,एकनाथ बांदेकर, सिद्धीविनायक कवठकर, सौ संगीता जोशी, सौ लतिका बांदेकर, सौ शेजल बांदेकर, व शिक्षक पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!